आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:कर्नाटक आगाराची बस अडवून युवकांकडून निषेध

उमरगा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेळगाव येथे कर्नाटकातील काही संघटनांनी महाराष्ट्रीयन बसवर दगडफेक करत, शिवरायांच्या फोटोची विटंबना करत मराठी विरोधात आंदोलन केले.त्यांनी केलेल्या कृत्याचा निषेध करीत प्रति उत्तर देत मराठा युवकांनी कर्नाटक आगाराच्या बसवर शिवरायांचा फोटो लावत, भगवा झेंडा लावत कर्नाटक शासन विरोधी घोषणा दिल्या. कर्नाटक राज्यातील बस औराद पाटी येथील बसस्थानकात थांबवली.

तसेच तुम्ही जर मराठी बस थांबवल्या तर आम्ही ही तुम्हाला येथून पळवून लावू असे सांगत जशास तसे उत्तर देऊ, असे युवकांनी ठणकावून सांगितले. पोलिसांच्या मध्यस्थीने बसला जाण्यास परवानगी देत आंदोलन थांबवले. यावेळी योगेश शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विष्णु कारभारी, राजू शिंदे, प्रकाश पवार, नागेश गायकवाड, स्वप्नील शिंदे, आदींसह युवक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...