आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळीत हंगाम:‘जकराया’ उसाला जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करणार : अॅड. जाधव

कुरुल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखाना यंदाच्या गळीत हंगामात पाच लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार असून, गाळपास आलेल्या उसाला जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बी. बी. जाधव यांनी सांगितले.

कारखान्याच्या १२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ अॅड. बी. बी. जाधव व उमादेवी जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी अॅड. जाधव बोलत होते. तत्पूर्वी कारखान्याला ऊसपुरवठा करणारे शेतकरी पाराप्पा पुजारी (मिरी) आणि पत्नी भागीरथी पुजारी यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा घालण्यात आली.

या वेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, संचालक राहुल जाधव, मोहोळचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर, प्रा. ज्ञानेश्वर जाधव, लक्ष्मण माने, एकनाथ वाघमारे, डॉ. बाळासाहेब सरवळे, ऊसतज्ञ डॉ. अंकुश चोरमुले, सोहाळेचे सरपंच ऋषिकेश जगताप, अंकुश आवताडे आदी या वेळी उपस्थित होते.या वेळी अॅड. जाधव म्हणाले, जकराया कारखान्याने गेल्या वर्षी ऊस दराबाबत दिलेला शब्द पाळला असून, कारखान्याच्या एफआरपीची रक्कम २२०५ रुपये खात्यावर जमा केली आहे. या वेळी चंद्रकांत सरवळे, सुभाष पाटील (वडापूर), सोहाळेचे ग्रा. पं. सदस्य बाळासाहेब नाईकनवरे, प्रभाकर पाटील, नेताजी वाघमारे, अरुण घुले,बाळासाहेब भोसले, भानुदास गावडे, विठोबा जगदाळे, मिरीचे माजी सरपंच रफिक पाटील,म्हाळाप्पा पाटील, हरिभाऊ घुले, किरण सरवळे, विनोद सोनवले, विनोद विभूते उपस्थित होते.

४० टक्के उसापासून साखर, ६० टक्के उसापासून इथेनॉल
या वेळी बोलताना कार्यकारी संचालक सचिन जाधव म्हणाले, कारखाना यंदाच्या गळीत हंगामात ४० टक्के उसाची साखर तर ६० टक्के उसापासून इथेनॉल निर्माण करणार आहे. साखर आयुक्तालयाने उसाची रिकव्हरी ठरवताना साखर आणि इथेनॉलची मिळून रिकव्हरी विचारात घेणे आवश्यक आहे. वेळोवेळी फक्त साखरेची रिकव्हरी जाहीर करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचा गैरसमज होतो.

बातम्या आणखी आहेत...