आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:मुकेश सायकर आदी मित्र परिवाराच्या वतीने जिल्हा परिषद वाटप; अनाळा झेडपी शाळेतील 300 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

अनाळा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परंडा तालुक्यातील अनाळा येथील व सध्या पुणे येथे स्थायिक असलेले अनिल शिंदे, राहुल शिंदे, विक्रम पाटुळे, उमेश गरत, मुकेश सायकर आदी मित्र परिवाराच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. सरपंच अंबिका क्षीरसागर यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेतील ३०० विद्यार्थ्यांना २ हजार वह्या व इतर शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. हा उपक्रम राबवण्याचा मित्र परिवाराचे हे पाचवे वर्षे आहे. सलग पाच वर्षांपासून ते येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करत आहेत.

याप्रसंगी उपसरपंच कल्याण शिंदे, निशिकांत क्षीरसागर, दादा फराटे, बिभीषण शिंदे, अजित शिंदे. ईश्वर ईटकर महाराज, अंगद सातपुते, भाऊसाहेब जाधव, मुख्याध्यापक सूर्यकांत साळुंके, पोलिस लक्ष्मण क्षीरसागर, बाळासाहेब शिंदे, दशरथ क्षीरसागर, मारूती सातपुते, केशव पवार, अमित देशमुख, रेवन्नाथ शिंदे यांच्यासह मोठया प्रमाणात ग्रामस्थ विध्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन केमदारणे यांनी तर घनश्याम पाटील यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...