आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा‎

उमरगा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद जिल्हा परिषदेंतर्गत‎ विविध विभागातील अधिकारी‎ आणि कर्मचाऱ्यांच्या तालुकानिहाय‎ क्रीडा स्पर्धेला शहरातील आदर्श‎ विद्यालयाच्या मैदानावर तीन‎ दिवसांपासून सुरुवात झाली आहे.‎ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी‎ अधिकारी डॉ राहुल गुप्ता यांच्या‎ संकल्पेतून जिल्हा परिषद‎ विभागातील अधिकारी व‎ कर्मचाऱ्यांचे क्रीडा स्पर्धाचे‎ आयोजन करण्यात आले आहे.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎

शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या‎ मैदानावर आयोजित तालुकास्तरीय‎ क्रीडा स्पर्धेचे गटविकास अधिकारी‎ कुलदिप कांबळे यांच्या हस्ते‎ उदघाटन झाले. यावेळी उपप्राचार्य‎ डॉ. सुरेश कुलकर्णी, माजी प्राचार्य‎ डॉ मन्मथ माळी, सहाय्यक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ गटविकास अधिकारी संतोष‎ वंगवाड, बालविकास प्रकल्प‎ अधिकारी देवानंद वाघ, तालुका‎ आरोग्य अधिकारी डॉ. एस एस‎ साळूंके, प्रा डॉ आप्पाराव सोनकाटे,‎ क्रीडा विभागाचे तालुका समन्वयक‎ सुरेंद्र वाले आदींची उपस्थिती होती.‎

पंच म्हणुन मुनीर शेख, राजेंद्र‎ सोलनकर, प्रविण ठाकुर, संतोष‎ राठोड, महादु शिदोरे काम पाहत‎ आहेत. दरम्यान स्पर्धेमध्ये कबड्डी,‎ खो-खो, व्हॉलिबॉल, बॅडमिंटन,‎ टेबल टेनिस यासह मैदानी क्रीडा‎ स्पर्धा होत आहेत. आठ‎ फेब्रुवारीपर्यंत स्पर्धा सुरु रहाणार‎ असुन चार दिवसात झालेल्या‎ स्पर्धत पुरुष व महिला संघानी‎ खिलाडूवृत्तीने सामन्यात रंगत‎ वाढवली आहे.‎ शासकीय खात्यात क्रीडा गुण‎ असलेले अनेक खेळाडू आहेत हे‎ अशा स्पर्धेच्या निमित्ताने दिसून‎ आले आहे. हे सामने पाहण्यासाठी‎ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे‎ कुटुंबियही उपस्थित होते.‎

शिक्षण विभागात रुजू झाल्यापासून‎ पहिल्यांदाच क्रीडा स्पर्धेत सहभाग‎ घेतला. यापुढेही अशा स्पर्धा‎ व्हाव्यात, जेणेकरून सरावाला‎ आणखी संधी मिळेल.‎ जयश्री गोबाडे, शिक्षिका.‎ जिल्हा परिषद अधिकारी व‎ कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा‎ आयोजित केल्यामुळे‎ कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह वाढला‎ आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी‎ यांच्या कल्पकतेमुळे जिल्हा‎ परिषदेचे अधिकारी व कर्मचारी‎ हिरहिरने क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग‎ घेऊन आपापल्या विभागाचा‎ नावलौकिक करीत आहेत.‎ सुरेंद्र वाले, तालुका क्रीडा‎ समवन्यक.‎

शिक्षण विभागात रुजू झाल्यापासून‎ पहिल्यांदाच क्रीडा स्पर्धेत सहभाग‎ घेतला. यापुढेही अशा स्पर्धा‎ व्हाव्यात, जेणेकरून सरावाला‎ आणखी संधी मिळेल.‎- जयश्री गोबाडे, शिक्षिका.‎

जिल्हा परिषद अधिकारी व‎ कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा‎ आयोजित केल्यामुळे‎ कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह वाढला‎ आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी‎ यांच्या कल्पकतेमुळे जिल्हा‎ परिषदेचे अधिकारी व कर्मचारी‎ हिरहिरने क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग‎ घेऊन आपापल्या विभागाचा‎ नावलौकिक करीत आहेत.‎- सुरेंद्र वाले, तालुका क्रीडा‎ समवन्यक.‎

बातम्या आणखी आहेत...