आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असून यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रा. बिराजदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, प्रदेश सचिव मसूद शेख, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, सुरेश पाटील, जिल्हा परिषद गटनेते महेंद्र धुरगुडे, प्रतापसिंह पाटील, संजय कांबळे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद पठाण, सईद काझी, कळंब शहराध्यक्ष मुसद्दीक काझी, उस्मानाबाद शहराध्यक्ष आयाज शेख, शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष श्याम घोगरे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष बिराजदार म्हणाले की, उस्मानाबाद जिल्ह्यातील जनता सुरवातीपासूनच शरद पवार यांच्यावर प्रेम करणारी व त्यांच्या विचारावर चालणारी आहे. समाजवादी काँग्रेस पासून राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीपर्यंत पवार यांच्यासोबत खंबीरपणे राहिलेली आहे. आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्या जनाधार मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी संपूर्ण तकतीनिशी स्वबळावर निवडणुका लढविणार आहे. कार्यक्रमात दत्ता पवार, अरुण माने, तालुका उपाध्यक्ष जयंत देशमुख, किसान सेलचे तालुकाध्यक्षऔदुंबर पाटील,ओबीसी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब स्वामी, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष अविनाश कांबळे, ॲड. योगेश सोन्नेपाटील, उस्मानाबाद शहर उपाध्यक्ष मनोज मुदगल, अनिकेत पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रशांत फंड, किसान सेल तालुका उपाध्यक्ष अमोल भातभागे, तालुका सचिव आश्रुबा गाढवे, युवक तालुका सचिव प्रविण लाडूळकर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अप्सरा पठाण, ज्योती माळाळे, युवती प्रभारी जिल्हाध्यक्ष श्वेता दुरुगकर, बालाजी तांबे, पृथ्वीराज चिलवंत, बाबा मुजावर, राजपाल दूधभाते, एस. के. इनामदार, आळणी सरपंच प्रमोद वीर, युवक तालुकाअध्यक्ष अमरसिंह देशमुख आदी उपस्थित होते.
वृक्षारोपण, आरोग्य शिबिर
वर्धापदिनानिमित्त जिल्हाभरात वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपला पक्ष क्रमांक एक वर आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सर्वस्व झोकून कामाला लागावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.