आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्षेप:लोहारा तालुक्यात झेडपी, पंचायत समिती गट; गणांच्या पुनर्रचनेसंदर्भात 8 जणांचे आक्षेप

लोहाराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या प्रारूप आराखड्यासंदर्भात आक्षेप दाखल करण्यासाठी बुधवारी (दि. ८) अंतिम मुदत होती. लोहारा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रयोजनार्थ केलेल्या विभागणीत राज्य निवडणूक आयोगाने ९ मे २०२२ रोजी आदेशाचे पालन झाले नसल्याचे सांगत ही पुनर्रचना तर्कसंगत व नैसर्गिक दृष्ट्या अयोग्य असल्याचे कारण देत आठ जणांनी आपले आक्षेप नोंदवले आहेत.

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभागरचना गुरुवारी (दि. २) जाहीर करण्यात आली. यात लोहारा तालुक्यात ४ ऐवजी आता ५ जि.प. गट तर ८ ऐवजी १० पंस गणाच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. पूर्वीच्या जिप गटात १ ने तर पंस गणसंख्या २ ने वाढली. प्रारूप प्रभाग रचनेत जि.प.गट व गणातील गावात मोठे फेरबदल झाले आहेत. त्यामुळे गट व गणातील प्रस्थापितांना आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन गट व गणात मतदारांशी संपर्क वाढवून राजकीय वर्चस्व सिद्ध करणे आव्हानात्मक झाले आहे. ज्या भागात आपली राजकीय ताकद जास्त आहे, तो भाग आपल्या गट व गणात यावा व जो भाग राजकीय वर्चस्वासाठी बाधा ठरणार आहे, तो भाग शेजारच्या गट व गणात जावा, यासाठी राजकीय प्रस्थापितांनी कंबर कसली आहे. सदरील पुनर्रचनेवर आक्षेप नोंदवण्याची बुधवारी (दि.८) शेवट तारीख होती.

लोहारा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, मनसेचे तालुकाध्यक्ष अतुल जाधव, नागुर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच गजेंद्र जावळे, माकणीचे उपसरपंच वामन भोरे, कोंडजीगडच्या वतीने उपसरपंच गोरखनाथ मुर्टे, गोविंद साळुंके, दत्ता गाडेकर, बालाजी वडजे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आक्षेप नोंदवले आहेत. गटांची पुनर्रचना करण्यात आली. यात अनेक चुका असल्याचे समजते. काही गटातील सुरुवातच्या व शेवटच्या गावातील अंतर हे जवळपास ३० किमी आहे. तसेच दळण वळणाच्या दृष्टीनेही गैरसोयीचे आहे. त्यामुळे यात बदल व्हावा अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

पुनर्रचनेत अक्षम्य चुका
राज्य निवडणूक आयोगाच्या ९ मे २०२२ च्या आदेशातील मुद्दा क्र. ४.५.२ मधील तरतुदीनुसार गणाच्या व गटाच्या सीमारेषा मोठे रस्ते, नाल्या, डोंगर, नदी आदी नैसर्गिक मर्यादा ओलांडू नये, मुद्दा क्र. ४.५.५ गट व गणाची पुनर्रचना आटोपशीर असावी, असे नमूद आहे. परंतु या सर्व नियमाचे उल्लंघन करून पुनर्रचनेत अक्षम्य चुका आहेत.
- सुनील साळुंके, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

प्रसंगी न्यायालयात जाऊ
लोहारा तालुक्यातील मतदारसंघाची पुनर्रचना करताना निवडणूक आयोगाने दिलेले नियम धाब्यावर बसवले. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे वेळेत आक्षेप नोंदवले आहेत. याची सुनावणी आयुक्तांकडे होणार असून तेथे योग्य न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार आहे.
-अतुल जाधव, तालुकाध्यक्ष, मनसे.

बातम्या आणखी आहेत...