आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्युहरचना:झेडपीचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध; 55 ऐवजी 61 गट तर 110 ऐवजी असणार 122 गण

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चुकीच्या पद्धतीने प्रभाग आराखडा तयार करण्यात आल्याच्या तक्रारी दाखल

नगरपालिकांच्या नंतर आता जिल्हा परिषदेच्या गट आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आवश्यक गट आणि गणांचा प्रभाग रचना आणि आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात आठ जून पर्यंत आक्षेप दाखल करता येणार आहे. यात ५५ एवजी ६१ गट असणार आहे. तसेच ११० ऐवजी १२२ गणांचा समावेश असणार आहे. त्यामुळे सदस्य संख्या वाढणार आहे. मात्र, प्रभाग रचना करताना चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना तयार करण्यात आल्याच्या तक्रारी, हरकती घेण्यास प्रारंभ झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणांची प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करुन आयोगाकडे जाण्यासाठी तयार होता. मात्र, पुन्हा नव्याने प्रभाग रचना करण्याचे उद्दिष्ट असल्याने आराखडा बदल करुन आयोगाला पाठवण्यात आला होता. आयोगाने त्यानुसार नियोजन करुन आराखडा प्रसिद्ध करण्याचे व त्यावर सुचना हरकती दावे मागवण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला आहे. त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही सुचना, हरकती, दावे, तक्रारींचा विचार करण्यात येणार नसल्याचे आदेशात जिल्हा अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी स्पष्ट केले आहेत. आराखडा करत असताना मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आल्याचे समोर आले आहेत. तसेच पुर्वीच्या अनेक गट आणि गणांच्या रचनेत बदल करण्यात आल्याचे चित्र आहेत.

तालुकानिहाय गट आणि गणांची संख्या
उस्मानाबाद गट १४ गण २८, तुळजापूर १० गट २० गण, लोहारा पाच गट १० गण, परंडा सहा गट १२ गण, कळंब नऊ गट १८ गण, उमरगा नऊ गट १८ गण, भूम पाच गट १० गण, वाशी तीन गट सहा गण.

पळसप, कसबे तडवळासह अन्य गट बदलले
उस्मानाबाद तालुक्यातील पळसप, कसबे तडवळा, आंबेजवळगा आणि वडगाव (सिद्धेश्वर) ही गट बदलले. यात आता जागजी, आळणी, करजखेडा, सारोळा (बुद्रूक) आणि कारी नव्याने गट तयार करण्यात आले आहेत.

लहान गावातील नेत्वृवाला तोटा
जिल्हा परिषदेकरता केलेली गटरचना चुकीची आहे. ही रचना सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी शासकीय व्यवस्थेचा दुरुपयोग करून केली. यात अनेक गावे नियमाचा भंग करून इतरत्र जोडली. या रचनेमुळे लहान गावातील राजकीय नेतृत्वाचा तोटा होणार आहे. त्यामुळे सदरची रचना बदलणे गरजेचे आहे, याबाबतचे आक्षेप जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात येतील.
अॅड. नितीन भोसले, जिल्हा सरचिटणीस, भाजप.

शिवसेना शाखेने कळवली आक्षेपांची तारीख
भाजच्या वतीने थेट आरोप करुन काही राजकीय नेत्यांनी सोयीचे गट व गण तयार करुन ही रचना केल्याचे आरोप केले. दुसरीकडे शिवसेनेच्या उस्मानाबाद तालुका शाखेनेही गट,गणांची आकडेवारी देऊन ८ जूनपर्यंत आक्षेप नोंदवण्याची तारीख असल्याचे सोशल मीडियावर स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात करावी लागणार तक्रार
गुरुवारी गट आणि गणाचा प्रभाग रचना आरखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार आठ जून पर्यंत २०२२ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात ज्यांना यावर आक्षेप आणि हरकती घ्यायच्या त्यांनी लेखी स्वरुपात करण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...