आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:नोकरीचे आमिष दाखवून 11 लाखांची फसवणूक

वाळूज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक येथील कंपनीत नोकरी लावून देतो, असे म्हणत ११ लाख २६ हजार ४६६ रुपयांची फसवणूक करणाऱ्या आर. एम. मोहितकुमार (रा. इंदूर, मध्य प्रदेश) याच्यासह इतरांवर एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय बाळकृष्ण पवार (५१, रा. सिडको वाळूज) यांच्याकडून आराेपींनी २४ फेब्रुवारी २०२० ते २३ जुलै २०२० दरम्यान ऑनलाइन अॅपद्वारे ११ लाखांपेक्षा अधिक रक्कम उकळली. दोन वर्षे उलटूनही नोकरी लावून देत नसल्याने पवार यांनी मोहितकुमारकडे पैशांची मागणी केली. तेव्हा त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पवार यांनी मोहितकुमार व इतरांविराेधात फिर्याद दिली. त्यावरुन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्यामकांत पाटील करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...