आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शासकीय आरोग्य यंत्रणेची सेवा चव्हाट्यावर:67 वर्षीय वृद्ध महिलेस झाडाखालीच लावले ऑक्सिजन, गरवारे कम्युनिटी सेंटर वाळूज येथील प्रकार

संतोष उगले | वाळूज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेंटरमध्ये 40 रिकामे खाट असताना एका झाडाखाली ऑक्सिजन लावल्याने नातेवाईकांचा संताप

वाळूज येथील गरवारे कम्युनिटी टेस्टिंग सेंटरवरील शासकीय आरोग्य यंत्रणेची सेवा चव्हाट्यावर आली आहे. येथे एका 67 वर्षीय महिलेस झाडाखाली ऑक्सिजन लावण्याचा प्रकार समोर आला. सेंटरमध्ये 40 रिकामे खाट असताना एका झाडाखाली व्हेंटिलेटर लावल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

वाळूज येथील गरवारे कम्युनिटी टेस्टिंग सेंटरवर शनिवारी दुपारी तपासणीसाठी आलेल्या 67 वर्षीय वृद्धेस श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पल्समिटरवर रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासले असता ते केवळ 82 असल्याने महिलेला तत्काळ ऑक्सिजन लावण्यात आले. मात्र सेंटरमध्ये 40 रिकामे खाट असताना एका झाडाखाली ऑक्सिजन लावल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. पुढील उपचारासाठी महिलेला महिलेला गंगापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महिलेला रुग्णवाहिकेतून गंगापूर येथील शासकीय रुग्णलयात उपचारासाठी हलवण्यात आले.
महिलेला रुग्णवाहिकेतून गंगापूर येथील शासकीय रुग्णलयात उपचारासाठी हलवण्यात आले.

दरम्यान सदरील ठिकाणी केवळ कोरोना रुग्णांची तपासणी केली जाते, असा दावा आरोग्य विभागाच्या तालुका अधिकाऱ्याकडून करण्यात आला आहे. मात्र तरीसुद्धा वृद्ध महिलेवर तत्काळ प्राथमिक उपचार करत रांजणगाव येथेल रुग्णाला सोडण्यासाठी गेलेली एकमेव रुग्णवाहिका बोलावून पुढे शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.