आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:रिव्हर्स येणाऱ्या पिकअपच्या मागे झोपलेला तरुण जागीच ठार, संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

वाळूज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उभ्या वाहनाखाली झोपलेल्या नामदेव लक्ष्मण गवळी (३४, रा. लिंबेजळगाव, ता. गंगापूर) या तरुणाचा वाहन मागे घेताना अंदाज न आल्याने वाहनाच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. ही घटना २८ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी मृत नामदेवचा नातेवाईक नवनाथ कारभारी गोलंडे यांनी ४ एप्रिल रोजी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादीनुसार, घटनेच्या दिवशी २८ मार्चला नामदेव एकादशीच्या दिवशी पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी सकाळी पायी निघाला होता. यादरम्यान आतेभाऊ नामदेव जखमी अवस्थेत पंढरपुरात पडल्याची माहिती सायंकाळी नवनाथला फोनवर मिळाली. त्यामुळे तो कैलास वैद्य यांना सोबत घेऊन घटनास्थळी गेला असता त्यांना नामदेव जखमी व बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्यांनी त्याला घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. एका दुकानातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता घटनेच्या दिवशी दुपारी २.४५ वाजता नामदेव पंढरपूर येथील बुलेट शोरूमजवळील उभ्या असणाऱ्या एका महिंद्रा पिकअपच्या मागे बसला व नंतर तिथेच झोपी गेला. याच वाहनाच्या चाकाखाली सापडून तो ठार झाल्याचे समोर आले.

बातम्या आणखी आहेत...