आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षाचालकावर गुन्हा:पतीपासून विभक्त झालेल्या 30 वर्षीय महिलेवर बलात्कार, पीडितेचा दोन वेळा गर्भपात

वाळूजएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पतीपासून विभक्त झालेल्या ३० वर्षीय महिलेवर रिक्षाचालकाने लग्नाचे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांपासून वारंवार बलात्कार केल्याची फिर्याद पीडितेने ४ जानेवारी रोजी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात दिली. याप्रकरणी वसीम सिद्दिकी (३९, रा. जुनाबाजार, औरंगाबाद) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडितेला दोन मुली व एक मुलगा झाल्यानंतर पतीसोबत खटके उडू लागले. त्यामुळे ते दोघेही विभक्त झाले. त्यानंतर पीडिता गेल्या चार वर्षांपासून रांजणगावात मुलांसह राहते. यादरम्यान, २०१७ मध्ये जालना येथून रेल्वेने औरंगाबाद स्टेशनवर उतरल्यानंतर पीडिता रांजणगावला जाण्यासाठी ज्या रिक्षात बसली होती त्या रिक्षाचालकाने पीडितेचा मोबाइल क्रमांक मिळवला. त्यानंतर दोघांमध्ये बोलणे व भेटणे सुरू झाले. त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करतो, असे आश्वासन देत आरोपी वसीमने विश्वासात घेऊन पीडितेच्या घरी येऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

विशेष बाब म्हणजे यादरम्यान, पीडिता दोनवेळा गरोदर राहिली असता तिचा गर्भपात केल्याची आपबीती पीडितेने तक्रारीत नोंदवली आहे. लॉकडाऊनकाळात आरोपीने महिलेकडून ६० हजार रुपये घेतले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वसीम बोलणे व भेटणे टाळत असल्याने पीडिता त्याच्या घरी गेली असता त्याच्या नातेवाइकांनी पुन्हा घरी आली तर ठार मारण्याची धमकी देत महिलेला शिवीगाळ करून घराबाहेर काढले. त्यानंतर पीडितेने पोलिसांत धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक गौतम वावळे तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...