आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:दीड लाख कर्ज काढून लग्न करणाऱ्या तरुणाला वधूचा गंडा; दागिने घेऊन पसार

वाळूज10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लग्नाच्या दोन दिवसांनंतर आई आजारी असल्याचे सांगत वधूने काढला पळ

वाळूजमधील तरुणाशी विवाह करून त्याची दीड लाखाची फसवणूक करणाऱ्या वधूसह तिच्या चौघा नातेवाइकांविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. विवाहेच्छुक तरुणांना शोधून त्यांची आर्थिक फसवणूक करणारे मोठे रॅकेट असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी वर्तवला.

राहुल विजय शेळके (२६, रा. रांजणगाव शेणपुंजी) वधूच्या शोधात होता. सुमन गणेश जाधवने (रा. जांभोरा, ता. अंबड) त्याला जालन्यात बोलावून पाच-सहा मुलींचे फोटो दाखवले. त्यातून राहुलने पूजा पवार नावाच्या मुलीला सिंदखेडराजा येथे जाऊन पसंत केले. तेथे सुमनने पूजाची आई आरती व काका राधाकिसन जावळे यांची ओळख करून दिली. लग्नासाठी मुलीच्या आईने दीड लाख मागितल्याचे सुमनने सांगितले. राहुलने ६ आॅक्टोबरला एका फायनान्स कंपनीकडून २ लाख रुपये कर्ज घेतले. १९ आॅक्टोबर २०१९ रोजी लग्नासाठी जालना येथील सुवर्णकारनगर गणपती मंदिरात राहुल आई व नातेवाइकासोबत पोहोचला. पूजाचे नातेवाइक तेथे होते. पण वधूची आई आजारी असल्याने आली नसल्याचे सांगण्यात आले. राहुलने सव्वा लाख पूजाच्या नातेवाइकांकडे दिले. तसेच, २५ हजारांचे दागिने घातले व तसे बाँड पेपरवर तसे नातेवाइकांकडून शपथेवर लिहून घेतले. विवाह झाल्यावर राहुल वधुसह रांजणगावात आला होता.

आई आजारी असल्याचे सांगत काढला पळ

लग्नाच्या दोनच दिवसांनंतर आईची प्रकृती अचानक बिघडल्याचे सांगत पूजा ही सुमन व तिच्यासोबत आलेल्या राधाकिन जावळेसोबत कारमधून निघून गेली. पण नंतर आली नाही. राहुल सिंदखेडराजाला गेल्यावर सासूने त्याला ओळख दाखवली नाही. शिवाय सुमनही भाेकरदन तालुक्यातील तपवन येथील असून तिचे खरे नाव गोदावरी जगदाळे असल्याचे कळाले.    

बातम्या आणखी आहेत...