आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चकमक:दोन वॉर्डात शिरसाटगट-भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये चकमक, राज्यातल्या सत्तेत दोस्ती पण ग्रापंच्या सत्तेसाठी हमरातुमरी

वाळूज15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट गटातील पदाधिकारी आणि भाजप पदाधिकाऱ्यांत वडगाव कोल्हाटी - बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीच्या वॉर्ड तीन, सहामध्ये मतदानावेळी गुरुवारी चकमक उडाली. राज्यात शिंदेसेना आणि भाजपचे सरकार असताना स्थानिक पातळीवर हमरातुमरी झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. बूथमध्ये प्रवेशापूर्वी मतदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप दोन्ही बाजूंचे पदाधिकारी मोठमोठ्याने ओरडून करत होते. त्यातून तणावाची स्थिती निर्माण झाली. या वादाचा लोक थेट राज्य पातळीवरील घडामोडींशी संंबंध जोडत होते. दरम्यान, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांचे एकेकाळचे समर्थक आणि आता शिंदेसेनेत गेलेले हनुमान भोंडवे यांना गद्दार म्हणून हिणवले. खरेतर भोंडवे खैरेंच्या पाया पडत होते. तरीही त्यांनी अपशब्द वापरल्याने भोंडवेंनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. काही मिनिटातच शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळही पोहोचले. त्यांच्या नेतृत्वात घोषणाबाजी सुरू होताच खैरे निघून गेले.

बातम्या आणखी आहेत...