आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔद्योगिक परिसरातील रेणुका इंजिनिअरिंग कंपनीत बुधवारी सायंकाळी ६:३० वाजता अचानक आग लागली. यात उद्योजक संतोष जगताप (४१, रा. सिडको) होरपळून जखमी झाले. त्यांना तत्काळ औरंगाबादेतील रुग्णालयात दाखल केले. एम सेक्टरमध्ये जगताप यांच्या मालकीची रेणुका इंजिनिअरिंग कंपनी आहे. या कंपनीत प्रेस मशीनसह इतर स्पेअर पार्टचे उत्पादन घेतले जाते. कंपनीतील कामगार एक महिला व तरुण सुटी झाल्यावर घरी गेले. त्यानंतर संदीपकुमार व जगताप दोघेच काम करत होते.
यादरम्यान, कंपनीच्या आतील इलेक्ट्रिकल बॉक्समधून धुराचे लोट व आग लागल्याचे जगताप यांच्या निदर्शनास आले. ते आग विझविण्यासाठी गेले असता, आगीचा भडका होऊन त्यात जगताप होरपळून निघाले. सुदैवाने ते बाहेर पळाले. त्यांच्या मागे संदीपकुमारही पळाला.त्याने आरडाओरड करत नागरिकांना मदतीसाठी बोलावले. या वेळी अजहर सय्यद व अलीम शेख यांनी जगताप यांना रुग्णालयात हलवले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान व एमआयडीसी वाळूज पोलिसांनी धाव घेतली. अर्ध्या तासाच्या परिश्रमाने आग आटोक्यात आली.
बॉक्सचा दरवाजा उघडताच भडका
इलेक्ट्रिकल बॉक्समध्ये लागलेली आग बॉक्सचा दरवाजा उघडताच भडका होऊन यात जगताप गंभीररीत्या भाजले गेले. ही आग इतकी तीव्र व भयंकर होती की त्यात त्यांच्या अंगावरील कपडे क्षणात जळून खाक झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.