आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:पॉझिटिव्हला सांगितले निगेटिव्ह आणि निगेटिव्हला पॉझिटिव्ह; वाळूज येथील आरोग्य केंद्रातील प्रकार, व्हिडिओ जारी करून तरुणीचा संताप

वाळूज2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आधी सांगितले तुमचा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह, आई-वडील निगेटिव्ह
  • नंतर कळाले आई-वडिलच कोरोना पॉझिटिव्ह भावाला कोरोना नाही

संतोष उगले

कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या बहिणीच्या संपर्कात आलेल्या कुटुंबियांचे 24 जून रोजी स्वँब घेण्यात आले. दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी 25 जून रोजी बजाजनगरच्या आरोग्य उपकेंद्रातून कुटुंबियांना फोन आला की, मुलीच्या संपर्कात आलेल्या तिच्या भावाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह तर आई-वडिलांचा निगेटिव्ह आला आहे. त्यानंतर आईने मुलाला कोविड केअर सेंटरमध्ये रवाना करण्याची तयारी केली. तेवढ्यातच पुन्हा आरोग्य विभागाकडून फोन करून सांगण्यात आले की, मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह असून मुलीच्या संपर्कात आलेल्या आई-वडीलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. जर निगेटिव्ह मुलगा पॉझिटिव्ह रूग्ण आहेत त्या ठिकाणी केअर सेंटरमध्ये पोहोचला असता तर, पॉझिटिव्ह असणारे आई-वडील इतरांच्या संपर्कात आले असते तर आदी प्रश्न उपस्थित करत तसेच या प्रकरणी हलगर्जी करणाऱ्या संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी बहिणीने केली. सोबतच, यासंदर्भातील एक व्हिडिओ जारी केला.

या प्रकरणातून आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. हा व्हिडिओ आता थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पोहोचल्याने त्यांच्याकडून दखल घेत संबंधीत प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची महिती आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने दिव्य मराठीला दिली.

वाळूज येथी बजाज ऑटो लिमीटेड कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या मुलीचा कोरोना अहवाल 24 जून रोजी पॉझिटीव्ह आला. दरम्यान त्याच रात्री तिच्या घरातील आई-वडील व भावाचा स्वँब बजाजनगरातील आरोग्य उपकेंद्राच्या वतीने घेण्यात आला. 25 जून रोजी सकाळी रिपोर्ट आल्यानंतर संबंधित अधिकारी यांच्याकडून घरातील नक्की कोणाला कोरोना झाला आहे याची चुकीची माहिती संबंधीत कुटुंबियांना देण्यात आल्याने त्या कुटुंबियांना त्रासातून जावे लागले. तसेच नक्की कोणाला कोरोना झाला आहे हे लवकर निश्चित झाले नसते तर कदाचीत अनर्थ घडला असता अशा अशयाची क्लीपच संतप्त बहिणीने तयार करून ही क्लीप आरोग्य मंत्री व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन जनतेला करत क्लीप व्हायर केली होती. बजाजनगरातील तसेच शहरातील शेकडो वाट्सअप ग्रुप तसेच फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल झालेली क्लीप शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा पदाधिकाऱ्यांनी आरोग्य मंत्री यांच्याकडे सदरील पोहोचल्याची माहिती माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...