आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षप्रेमींकडून खंत:एमआयडीसी वाळूज ठाण्यात झाडे कापून कमळ फुलवणार, पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांची माहीती

वाळूज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र व राज्य सरकार ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देते. मात्र, या संदेशाला फाटा देत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात वृक्षतोड करण्यात आली. त्यामुळे वृक्षप्रेमींकडून खंत व्यक्त केली जात आहे. परंतु, वन विभागाच्या परवानगीने तोडलेल्या झाडांच्या जागी आता हरळी आणि मध्यभागी ‘कमळ’ फुलणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली.

वाळूज औद्योगिक परिसर ग्रीन व स्वच्छ करण्यासाठी आठ वर्षांपासून उद्योजक परिश्रम घेत आहेत. अनेक नामांकित कंपन्यांतर्फे रस्त्याच्या कडेने लावलेली झाडे दत्तक घेऊन त्यांचे संगोपन केले जात आहे. यात स्टरलाइट, मेटलमॅन, एनआरबी बेअरिंग, एंड्रेस हाऊजर, बीकेटी, बजाज ऑटो आदी कंपन्यांचा सहभाग आहे. या प्रेरणेतून एमआयडीसी वाळूज ठाण्यात त्या-त्या कार्यकाळातील कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करून आजवर त्याचे संगोपन केले. यात तत्कालीन पोलिस निरीक्षक किशोर नवले यांच्यासह पोलिस निरीक्षक नाथा जाधव, ज्ञानेश्वर साबळे, अशोक थोरात, अनिल गायकवाड, मधुकर सावंत, तत्कालीन पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांचासुद्धा समावेश होता. या सर्व अधिकाऱ्यांनी लावलेली झाडे आता बुडासकट तोडण्यात आली.

विविध ५० झाडे लावणार
पोलिस ठाण्यातील झाडे तोडून तयार केलेल्या जागेवर आता हरळी, तर मध्यभागी कमळ लावण्यात येणार आहे. त्यासोबतच ठाण्याच्या मागील बाजूने कडूनिंब, चिंच, आंबा आदी प्रकारची ५० झाडे लावण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...