आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूज:रांजणगावात दारूबंदीसाठी लवकरच मतदान घेणार : आ. प्रशांत बंब

वाळूज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांजणगाव येथे दारूबंदीसाठी मतदान घेणार असल्याचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले. रांजणगाव शेणपुंजी येथे महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रांजणगाव शेणपुंजी परिसरात मोठ्या प्रमाणात अधिकृत व अनधिकृतरीत्या दारू विक्री होत आहे. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत असल्याची खंत अनेक महिलांनी भाजपचे पंचायत समिती सदस्य दीपक बडे यांच्या माध्यमातून आ. बंब यांच्याकडे व्यक्त केली होती. याची दखल घेत १३ मार्च रोजी झालेल्या कार्यक्रमात आ. बंब यांनी महिलांची समस्या सोडवण्याचे आश्वासन देत बचत गटांना व्यवसायासाठी विविध योजनांद्वारे अर्थसाह्य देण्याचे आश्वासन दिले.

पंचायत समिती सदस्य दीपक बडे यांनी ‘सन्मान स्त्री कर्तृत्वाचा’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी आमदार प्रशांत बंब, तर सरपंच कांताबाई जाधव, उपसरपंच शिवराम ठोंबरे, जनकल्याण महिला पंतसंस्थाच्या अध्यक्षा रमा उबाळे, गोरख शेळके, जि.प. सदस्य उषा हिवाळे, पं. स. सदस्य कृष्णा सुकासे, ज्योती गायकवाड, शरद कीर्तीकर, महादेव दाभाडे, मीनाक्षी जाधव, ताराबाई शिंदे, नारायण कानडे, भारती साळुंके, आजिनाथ उबाळे यांची उपस्थिती होती. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २२ महिलांचा आ. बंब यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी सोमनाथ नेमाणे, गणेश हिवाळे, गोविंद चाटे, शैलेश कारखिले, दीपक घाईट,

बातम्या आणखी आहेत...