आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनर्थ टळला:अंत्यविधी करून परतताना गाडी पेटली; सुदैवाने वाहनामधील सर्वच प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला

वाळूज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-नगर महामार्गावर भरधाव स्कॉर्पिओने (एमएच १२, जेएम ९००६) अचानक पेट घेतला. सुदैवाने वाहनामधील सर्वच प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, स्कॉर्पिओचे मोठे नुकसान झाले.

नगर येथून सिडको वाळूज महानगर-२ येथे अंत्यविधीसाठी आलेले नातेवाईक ६ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता परत जात होते. दरम्यान, वाळूज महानगर-१ कमानीसमोर जीपच्या स्विच सॉकेटमधून धूर निघत असल्याचे चालक दत्तू महादेव आंधळे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ वाहन रस्त्याच्या बाजूला उभे करून आतील प्रवासी सुभाष गोविंद जोशी, चंद्रकांत विठ्ठल जोशी, नंदा सुभाष जोशी, पुष्पा जोशी, सुरेश, पंढरीनाथ जोशी (सर्व रा. अहमदनगर) यांना खाली उतरण्यास सांगितले. सर्वजण तत्काळ वाहनाबाहेर पडले. चालकाने जीपचे बोनेट उघडून काय समस्या झाली हे बघण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत धुराचे रूपांतर आगीत झाले होते. घटनेची माहिती मिळताच फौजदार राजेंद्र बांगर यांच्यासह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. तोपर्यंत आगीत जळून वाहनाचे मोठे नुकसान झाले होते. स्कॉर्पिओमधील कुलंट संपल्याने आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

बातम्या आणखी आहेत...