आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:बलात्कार प्रकरणातील संशयिताची आत्महत्या, भांगसीमाता गडावर तरुणीवर बलात्कार केल्याचा होता आरोप

वाळूज3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलात्कार प्रकरणातील संशयित रावसाहेब भाऊसाहेब माळी याने तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावरून उडी मारली तो क्षण. - Divya Marathi
बलात्कार प्रकरणातील संशयित रावसाहेब भाऊसाहेब माळी याने तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावरून उडी मारली तो क्षण.
  • पोलिस पाठलाग करत असताना तिसगावातील खवड्या डाेंगरावरून भावासमाेरच घेतली उडी

भांगसीमाता गडावर मित्रासाेबत फिरायला गेलेल्या तरुणीवर बलात्कार केल्याचा आराेप असलेल्या एका संशयिताने गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तिसगाव परिसरातील खवड्या डाेंगरावरून उडी घेऊन आत्महत्या केली. रावसाहेब भाऊसाहेब माळी (३२, रा. तिसगाव) असे मृताचे नाव आहे. पाठलाग करत असलेल्या पाेलिसांना गंुगारा देण्यासाठी रावसाहेब डाेंगरावर पळत हाेता. भावाने त्याला पाेलिसांना शरण येण्याची विनंती केली, मात्र त्याला न जुमानता त्याने डाेंगरावरून उडी मारत जीवन संपवले. त्याच्यावर यापूर्वीही एक बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

दौलताबादपासून जवळच असलेल्या भांगसीमाता गडावर ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली हाेती. दाेन आराेपींनी पीडिता व मित्राला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केले हाेते. पीडितेच्या तक्रारीवरून अज्ञात दाेघांविराेधात गुन्हा दाखल झाला हाेता. तेव्हापासून पाेलिस आराेपींचा शाेध घेत हाेते.

पीडितेने दिलेल्या वर्णनाच्या आधारे ५ आॅगस्टला पाेलिसांनी एका शिवारात लपून बसलेल्या राजू अंबादास माळी (३५, रा. शरणापूर) यास संशयावरून ताब्यात घेतले हाेते. चाैकशीत आपण चुलत भाऊ रावसाहेबसाेबत या गुन्ह्यात सहभागी हाेताे, अशी कबुली राजूने दिल्याचा दावा पाेलिसांनी केला आहे. दरम्यान, राजूला दाैलताबाद पाेलिस ठाण्यात आणले हाेते. दुसऱ्या साथीदाराची त्याच्याकडे चाैकशी सुरू हाेती.

रात्री आठच्या सुमारास पाऊस पडत असताना लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने राजू पाेलिस ठाण्याच्या इमारतीत खालच्या मजल्यावर आला व पाेलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. हे कळताच पाेलिसांची पाचावर धारण बसली. त्यांनी राजूचा शाेध घेणे सुरू केले. फरार आराेपी रावसाहेबचाही शाेध सुरूच हाेता. गुरुवारी पाेलिस त्याच्या गावी तिसगावात गेले. रावसाहेबच्या घरी जाऊन त्यांनी त्याची चाैकशी केली. मात्र ताे सापडला नाही. त्यामुळे पाेलिसांनी रावसाहेबच्या वडिलांना ताब्यात घेतले हाेते. दरम्यान, पाेलिस पाठलाग करत असल्याची चाहूल लागताच संशयित रावसाहेब आरडाआेरडा करत पळू लागला. गावाजवळील खवड्या डोंगराच्या दिशेने त्याने धाव घेतली. त्याच्या मागे सख्खा भाऊ रमेशही पळू लागला. ‘वडिलांना तत्काळ साेडून द्यावे, माझा पाठलाग न करता पाेलिसांनी निघून जावे, अन्यथा मी जीव देईन’ अशा धमक्या रावसाहेब डाेंगराच्या काठावर उभा राहून देऊ लागला. पाठीमागे असलेला भाऊ रमेश त्याची समजूत काढत हाेता. ‘पाेलिसांना शरण ये, टाेकाचे पाऊल उचलू नकाे,’ असे ताे जाेरजाेराने आेरडून भावाला सांगत हाेता. मात्र, भावाच्या विनवणीला न जुमानता रावसाहेबने क्षणार्धात डाेंगरावरून दरीत उडी घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे महामार्गावरून जाणारे लाेक हा गाेंधळ पाहत हाेते. काहींनी घटनेचा व्हिडिओ करून साेशल मीडियावर टाकला. त्यात रावसाहेबची आत्महत्या ‘लाइव्ह’ चित्रित झाली आहे.

यापूर्वी अन्य एका तरुणीवर बलात्कार : बलात्कार करणाऱ्या मुख्य आरोपीचा डावा डाेळा निकामी झालेला हाेता, दाढीही हाेती, असे वर्णन पीडित मुलीने तक्रारीत केले हाेते. हे वर्णन मिळतेजुळते असल्याने पाेलिसांना रावसाहेबवर संशय हाेता. यापूर्वीही भांगसीमाता गड परिसरात एका तरुणीवर बलात्कार केल्याचा त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. याच पद्धतीने मित्रांसाेबत फिरायला गेलेल्या अन्य एका तरुणीवर त्याने यापूर्वी अत्याचार केले हाेते. त्या वेळीही अटक करण्यासाठी आलेल्या पाेलिसांपासून वाचण्यासाठी रावसाहेब विजेच्या खांबावर चढला हाेता व उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी त्याने दिली हाेती. त्यामुळे रावसाहेब हाच बलात्कार प्रकरणातील मुख्य आराेपी असल्याची खात्री हाेती, असे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी सांगितले.

मृत्यूनंतर भावाचा फाेन, म्हणे ‘मी रावसाहेबला पकडले’

रावसाहेब डोंगरावरून पळत असताना त्याचा भाऊ रमेशदेखील त्याच्या मागे पळत होता. रावसाहेब अगदी कडेला उभा असताना त्यांच्यात काही क्षण संवाद झाला. त्याच वेळी रावसाहेबने डाेंगरावरून दरीत उडी घेतली. तो खाली पडल्यानंतर मात्र भाऊ रमेशने एका पाेलिस उपनिरीक्षकाला फाेन करून ‘मी रावसाहेबला पकडले आहे, तुम्ही पटकन डोंगरावर या’, असे सांगितले. पोलिसांनी नंतर कॉलचा वेळ व व्हिडिओतील घटनेची वेळ खातरजमा केली असता रावसाहेबच्या मृत्यूनंतरच रमेशने कॉल हा घटनेेनंतर केल्याचे स्पष्ट आहे, असे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...