आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराणा प्रताप चौक, बजाजनगर येथील पदमपाणी बुद्धविहाराच्या प्रवेशद्वारात अंदाजे ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याची घटना विहाराच्या सुरक्षारक्षकाच्या शुक्रवारी २२ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली असून त्याने पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पद्मपाणी बुद्धविहार येथील सुरक्षा रक्षक रतन सरोदे नियमितप्रमाणे पहाटे पाच वाजता उठून विहार परिसरात आले असता त्यांना मुख्य प्रवेशद्वाराजवळ अनोळखी पुरुष रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसले. त्यांनी ही माहिती तात्काळ विहाराचे अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड यांना दिली. पुढे गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन खात्री करून घेत ही माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, फौजदार सतीश पंडित आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याने चौकशीदरम्यान संपूर्ण घटनेची माहिती दिली.
50 रुपयांवरून केला खून?
संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितल्याप्रमाणे, रात्री 60 वर्षीय सोमिनाथ आनंदा राठोड जेवणासाठी पैसे मागत होते. या दरम्यान आरोपीने त्यांना आरोपीने जेवण्यासाठी 50 रुपये दिले होते. पण, त्या पैशातून सोमिनाथने जेवण न करता दारू घेतली. याच वादातून आरोपीने त्याचा खून केला. आरोपीचे नाव अद्याप समोर आले नाही. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याच आरोपीला दोन महिन्यांपूर्वी परिसरात तलवार घेऊन फिरताना पाहण्यात आले होते. त्याला पकडून सोडण्यात आले होते.
कोण होता मृतक
मयत व्यक्तीच्या खिशात आढळून आलेल्या कागदावरील मोबाईल क्रमांकावर गुन्हे शाखेचे फौजदार अमोल देशमुख व योगेश धोंडे यांनी संपर्क साधला असता मयत व्यक्ती ही आपले काका असून त्यांचे नाव सोमिनाथ आनंदा राठोड (६०, रा.पळशीलगत,आडगाव तांडा ता.औरंगाबाद) हे असल्याचे उघड झाले. मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी पत्नीचा मृत्यू झाल्यापासून मयत हे औद्योगिक परिसरातच मिळेल ते काम करून गुजारा करत असल्याचे पुतण्याने पोलिसांना सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.