आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलूप तोडून घरफोडी:एमआयडीसी वाळूज, पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव कोल्हाटीमध्ये 7 घरफोड्या

संतोष उगले । वाळूजएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे सर्वजण नववर्षाचे स्वागत करण्यात तल्लीन असतानाच दुसरीकडे भुरट्या चोरट्यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वडगाव कोल्हाटी गट नंबर ८ व ५ येथील एक-दोन नव्हे तर तब्बल सात घरफोड्या करत हात साफ केल्याची घटना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक जानेवारी रोजी पहाटे उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सचिन पागोटे पोलिस कर्मचारी संघराज दाभाडे, प्रकाश गायकवाड, एस एन भोटकर, रोहित चिंधले यांनी घटनास्थळी जाऊन परिसराची पाहणी केली.

घर फोडी झालेल्यामध्ये समाधान यमराज शिरसाट, रावसाहेब यमराज शिरसाट, विकास सपकाळ, कालिदास गायकवाड, सिद्धार्थ दळवी, किरण निळ व प्रमोद जाधव यांचा समावेश आहे. या घटनेत सर्वांचे मिळून एकूण रोख ९० हजार रुपये तसेच अडीच ते तीन लाख रुपये किमतीच्या वस्तू त्यात टीव्ही, सोने, चांदी आदींचा समावेश आहे.

चोरट्यांनी कुलूप बंद घरांना लक्ष करत कुलूप तोडून घरफोडी केली आहे. यापूर्वीसुद्धा या परिसरात अशाच पद्धतीने घरफोड्या झालेल्या आहेत मात्र, आजवर चोरटे हाती न लागल्याने अधूनमधून चोरीच्या घटना घडतच आहेत. गट नंबर परिसरात स्वतंत्र पोलिस चौकी सुरू करावी अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...