आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मागील दोन वर्षांत तब्बल एक लाख कामे अपूर्ण आहेत. यामध्ये सर्वात जास्त अपूर्ण कामांची संख्या औरंगाबाद जिल्ह्यात आहे. विशेष म्हणजे वारंवार बैठका होऊनही कामे मात्र पूर्ण होत नसल्याचे चित्र.
मराठवाड्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी मोठ्या संख्येने कामे हाती घेण्याच्या सूचना यंत्रणांना देण्यात आल्या होत्या. यामध्ये ग्रामपंचायत सोबतच इतर यंत्रणेमार्फत ४ लाख ६९ हजार कामे सुरू करण्यात आली होती. मागील दोन वर्षांत ही कामे सुरू करण्यात आली असून यामध्ये प्रामुख्याने पाणंद रस्ते, शेततळे, सार्वजनिक विहिरी यासह इतर कामांचा समावेश आहे.
मात्र यापैकी ३ लाख ६९ हजार कामे पूर्ण झाली असून अद्यापही १ लाख कामे अपूर्ण आहेत. यामध्ये सर्वात जास्त पूर्ण कामे औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. विशेष म्हणजे अपूर्ण कामे पूर्ण करा संदर्भामध्ये विभागीय आयुक्त कार्यालय स्तरावरून वारंवार बैठका घेण्यात आल्या. याशिवाय स्थानिक जिल्हा पातळीवरूनही घेण्यात आलेल्या बैठकांमधून अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. मात्र या बैठकांमधून केवळ सूचना देण्याचे सोपस्कार पार पाडले जात असल्याचे चित्र या अपूर्ण कामावरून दिसू लागले आहे. त्यामुळे आता दोन वर्षांपासून रखडलेली कामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
कामे रखडतात : मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी हमी योजनेची कामे सुरू केली जातात. मात्र पावसाळ्याचे कारण दाखवत वैयक्तिक स्वरूपाची कामे रखडतात.
जिल्हानिहाय कामांची संख्या अशी
जिल्हा कामे सुरू कामे पूर्ण कामे अपूर्ण
औरंगाबाद ६१,९७७ ४४,७०१ १७,२७६
बीड ६२,८१५ ४८,११२ १४,७०३
हिंगोली २८,८२८ २२,३७० ६,४५८
जालना ७३,४७६ ५६,९०३ १६,५७३
लातूर ५८,८४९ ५३,०९० ५,७५९
नांदेड ८७,६५६ ७१,४९३ १६,१६३
उस्मानाबाद ५३,४६४ ४०,५८६ १२,८७८
परभणी ४२,१०० ३१,७२२ १०,३७८
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.