आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:बालिकेवर अत्याचार प्रकरणी 10 वर्षांचा कारावास, कुंभारवाडी येथे घडला होता प्रकार, हिंगोली न्यायालयाचा निर्णय

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याअंतर्गत कुंभारवाडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी रामा कामन डाखोरे (२०) यास १० वर्षे कारावास व दोन हजार एक हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. बुलबुले यांनी मंगळवारी (१० मे) दिला आहे.

सहायक सरकारी वकील अॅड.एन.एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील कुंभारवाडी येथील एक अल्पवयीन मुलगी ३१ जुलै २०२० रोजी दुपारी घरासमोर खेळत होती. यावेळी रामाने त्या मुलीचे तोंड दाबून घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार तिने सायंकाळी कामावरून परत आलेल्या तिच्या आईवडिलांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईवडिलांनी थेट आखाडा बाळापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. आखाडा बाळापूर ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक रविकांत हुंडेकर यांच्या पथकाने अधिक तपास करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. बुलबुले यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. या प्रकरणात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड.एन.एस. मुटकुळे यांनी काम पाहिले. त्यांना अॅड.एस.डी.कुटे यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...