आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसापूर धरणाचे 9 दरवाजे 50 सेंटीमिटरने उघडले:14615 क्युसेक पाण्याचा विसर्ग; मच्छीमारांनी पैनगंगा नदीत न जाण्याचे आवाहन

हिंगोली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इसापूर धरणातील पाणी पातळी नियंत्रीत करण्यासाठी शुक्रवारी ता. ५ सकाळी दहा वाजता धरणाचे एकूण 9 दरवाजे 50 सेंटीमिटरने उघडण्यात आले असून धरणातून 14615 क्युसेकने पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे मच्छीमारांनी पैनगंगानदीत जाऊ नये असे आवाहन उर्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयाचे अभियंता एस. एच.धुळगंडे यांनी केले आहे.

पाण्याची टक्केवारी 93.80 एवढी

इसापूर धरणात सध्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरु असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्यामुळे पाणी साठ्यात मोठी वाढ होऊ लागली आहे. धरणाची पाणी पातळी क्षमता 440.37 मिटर आहे. सध्या धरणामध्ये 904.338 दशलक्ष घनमिटर पाणीसाठा झाला असून पाण्याची टक्केवारी 93.80 एवढी आहे.

म्हणून पाण्याचा विसर्ग

धरणाचे दरवाजे उघताच पाण्याचे दिसणारे रौद्ररूप
धरणाचे दरवाजे उघताच पाण्याचे दिसणारे रौद्ररूप

धरणात 15 ऑगस्टपर्यंत धरणाची पाणी पातळी 440.35 मिटर म्हणजेच 93. 62 टक्के पाणीसाठा ठेवावा लागणार आहे. मात्र पाणी पातळी त्यापेक्षा अधिक असल्याने धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली आहे.

धरणाचे एकूण 9 दरवाजे उघडले

दरम्यान, शुक्रवारी (ता. 5) सकाळी दहा वाजता धरणाचे एकूण 9 दरवाजे 50 सेंटीमिटरने उघडण्यात आले आहे. यामध्ये दरवाजा क्रमांक 2, 14, 8, 7, 9, 6, 10, 5, 11 या दरावाजांचा समावेश आहे. यातून 14615 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग वाढविणे व कमी करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

मासेमारीसाठी जाऊ नये

धरणातील पाणी पैनगंगानदी पात्रात सोडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे तसेच मच्छीमारांनी नदीमध्ये मच्छीमारीसाठी जाऊ नये असे आवाहन धुळगंडे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...