आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस ऑपरेशन:वसमतला 15 तलवारी, 3 खंजीर जप्त, ‘ऑपरेशन क्लीन सिटी’अंतर्गत कारवाई

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत शहर पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन क्लीन सिटी मोहिमेत छापे टाकून १५ तलवारी, तीन खंजीर व एक चाकू जप्त केला. याप्रकरणी चौघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी ठाणेदारांची बैठक घेऊन गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हाभरातील १३ पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. दरम्यान, वसमत ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर कदम, उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे, उपनिरीक्षक प्रकाश आवडे, जमादार कृष्णा चव्हाण, बालाजी मिरासे, भगीरथ सवंडकर, गुठ्ठे, राहूल महिपाळे, शेख हकीम यांच्यासह पथकाने रविवारी पहाटे क्लिन सिटी ही मोहीम राबवली. यात रेल्वेस्टेशन भागातून बच्चनसिंग चव्हाण, भारतसिंग चव्हाण, छालासिंग चव्हाण, संजूसिंग बावरी यांच्या घरातून १५ तलवारी, तीन खंजीर, एक चाकू आढळून आला. पोलिसांनी सदरील शस्त्रे जप्त करत चौघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच वसमत येथील मोंढा भागातील पाहणीमध्ये सुशील वाघमारे (रा. गणेशनगर, कुरुंदा) हा गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसल्याचे आढळून आल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...