आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिको सॅटेलाइट:दीडशे पिको सॅटेलाइट अवकाशात सोडणार

हिंगाेलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पट्टीपुरम (तामिळनाडू) येथील इस्रोच्या केंद्रातून एकाच वेळी १५० पिको सॅटेलाइट अवकाशात सोडले जाणार असून पिको सॅटेलाइट तयार करण्यासाठी देशभरातून १५०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ. आनंद यांचे पथक मार्गदर्शन करीत आहेत. एकाच वेळी १५० पिकाे सॅटेलाइट सोडण्याचा हा विक्रम नोंदवला जाणार आहे. यात वसमतच्या १० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

देशात जास्तीत जास्त वैज्ञानिक तयार व्हावेत हे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. इस्रोच्या मार्गदर्शनाखाली पिको सॅटेलाइट तयार केले जाणार आहेत. त्यासाठी वैज्ञानिक क्षेत्रात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. त्यानंतर देशातील निवडक १५०० विद्यार्थ्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना इस्रोचे शास्त्रज्ञ डॉ.आनंद यांच्या पथकासोबतच जपानमधील येथील शास्त्रज्ञ विद्यार्थ्यांना पिको सॅटेलाइट तयार करण्याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. दररोज दुपारी ४.३० ते ५.३० या वेळेत या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. यामध्ये पिको सॅटेलाइट कसा तयार करतात याची माहिती दिली जात आहे. त्यानंतर १६ जानेवारीपासून महाराष्ट्रात दोन दिवस पुणे, नागपूर येथे प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. यामध्ये प्रत्यक्षात पिको सॅटेलाइट तयार केले जाणार आहे. त्यानंतर सर्व सॅटेलाइट डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशनमार्फत इस्रोच्या पट्टीपुरम येथील केंद्रावर नेले जाणार आहेत. त्या ठिकाणी शास्त्रज्ञांकडून त्यांची पाहणी केली जाणार आहे.

रॉकेटचे वजन असणार २२.५ किलो पिको सॅटेलाइट अवकाशात सोडण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या रॉकेटचे वजन २२.५ किलो असणार आहे. त्यावर १५० सॅटेलाइट बसवल्यानंतर त्याचे वजन ४५ ते ६० किलोपर्यंत असणार आहे. हे रॉकेट सोडल्यानंतर पॅराशूटच्या मदतीने परत जमीनीवर लँड केले जाईल.

रॉकेट तयारीसाठी १०० विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांनी तयार केलेले पिको सॅटेलाइट अवकाशात सोडण्यासाठी रॉकेट तयार केले जाणार आहे. यासाठी या १५०० विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेऊन त्यापैकी १०० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना चेन्नई येथे प्रत्यक्षात रॉकेट बनवण्याची संधी मिळणार आहे.

या विद्यार्थ्यांचा असणार समावेश लालबहादूर शास्त्री शाळेचे श्रेयस चव्हाण, सत्यम बेले, वैभवी कमळू, विजय सोनी, स्वराज पत्रे, आयुष कोंडेकर, पीयूष बेले, गौरव सोळंके, शिवम भुतकर, वेदिका चापके, कौशल पाटील यांचा समावेश आहे. संस्थेचे अध्यक्ष संदीप चव्हाण, सचिन लाठकर मार्गदर्शन करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...