आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइसापुर धरणाचा आणखी एक दरवाजा शुक्रवारी (ता. 29) सकाळी आठ वाजता 20 सेंटीमीटरने उघडण्यात आला आहे. धरणातून आता 1934 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पाण्याची होणारी आवक लक्षात घेता आणखी दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
धरणात पाणीसाठा वाढला
उर्ध्वपैनगंगा प्रकल्पाच्या इसापुर धरणात मागील काही दिवसात पाणीसाठा वाढला आहे. 31 जुलैपर्यंत निश्चित केलेल्या पाणीसाठेची पातळी ओलांडल्यामुळे प्रकल्प कार्यालयाने गुरुवारी (ता. 29) सायंकाळी पाच वाजता धरणाचे दोन दरवाजे 20 सेंटीमीटरने उघडून 1295 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. मात्र धरणामध्ये पाण्याची आवक सुरूच असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. धरणात सध्या 91.43 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातून आणखी पाण्याचा विसर्ग करणे आवश्यक झाले.
धरणाचा 8 क्रमांकाचा दरवाजा उघडला
आज सकाळी आठ वाजता धरणाचा 8 क्रमांकाचा दरवाजा वीस सेंटीमीटरने उघडण्यात आला आहे. आता धरणाच्या दरवाजा क्र. 2, दरवाजा क्रमांक 14 व दरवाजा क्रमांक 8 या दरवाजामधून 1934 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
नागरीकांना सतर्कतेचा इशारा
सध्या धरणामध्ये पाण्याची आवक सुरू असून पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याचे प्रकल्प कार्यालयाचे कर्मचारी पप्पू मनवर यांनी सांगितले. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे किंवा कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. नदी काठावरील तसेच पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी एच. एस. धुळगंडे यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.