आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातोडा:तीन जेसीबी, 10 ट्रॅक्टरद्वारे 195 अतिक्रमणे हटवली, विरोध करणारे शिवसेना जिल्हाप्रमुख ताब्यात

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील जलेश्वर तलावाच्या परिसरात असलेली १९५ अतिक्रमणे शुक्रवारी (१६ डिसेंबर) हटवण्यात आली. या वेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. अतिक्रमण हटवण्यास विरोध करणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनायक भिसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील जलेश्वर तलावाच्या परिसरात १९५ अतिक्रमणधारकांना महसूल प्रशासनाने नोटीस दिल्या होत्या. त्यानंतर शुक्रवारी सकाळी अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वागवाड, पोलिस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढून घेण्यासाठी दोन तासांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर सकाळी ९ वाजल्यापासून पालिकेकडून प्रत्यक्षात अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली. तीन जेसीबी मशीन, दहा ट्रॅक्टरच्या मदतीने अतिक्रमण काढून साहित्य जप्त केले जात होते. काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती.

बातम्या आणखी आहेत...