आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडफेक प्रकरण:हिंगोलीत दगडफेक प्रकरणातील 20 जण दोषी; पोलिसांकडून शोध, गुन्हा दाखल

हिंगाेलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील जलेश्वर तलावाच्या परिसरात पोलिस व पालिका कर्मचाऱ्यांवर दगडफेक झाली होती. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी २० जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शनिवारी (१७ डिसेंबर) रात्री गुन्हा दाखल झाला. यामध्ये सहा महिलांचाही समावेश आहे. आता आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

या प्रकरणात पालिकेचे कर्मचारी पंडित मस्के यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात निरंजन सातपुते, सागर रणवीर, शिवम काळे, मुकेश काळे, आनंद धवसे, शंकर गाधी, अक्षय वाघमारे, अनिल नीळकंठे, नितीन पवार, हेमंत शेळके, अक्षय मांडगे, किशोर खिल्लारे यांच्यासह अन्य आठ जणांवर शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपींचा शोध घेण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेवर सोपवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...