आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावसमत तालुक्यातील इंजनगाव पश्चिम येथील एका अल्पवयीन मुलीस फुस लाऊन पळवून नेत अत्याचार केल्या प्रकरणात तरुणाला 20 वर्ष सश्रम कारावास व 50 हजाराच्या दंडाच्या शिक्षेचा निर्णय वसमतचे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश यु. सी. देशमुख यांनी दिला आहे.
याबाबत सहाय्यक सरकारी वकील ॲड. संतोष दासरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालु्क्यातील इंजनगाव पश्चिम येथील एका अल्पवयीन मुलीस गावातील शुभम केशव गायकवाड याने ता. 30 एप्रिल 2022 रोजी फुस लाऊन पळवून नेले.
या प्रकरणी त्या मुलीच्या आईने वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यामध्ये पोलिसांनी शोध घेतला असता सदर मुलगी व आरोपी शुभम हा ता. 22 डिसेंबर 2022 रोजी पुणे जिल्हयात सापडले. या प्रकरणात वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अत्याचार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास चवळी यांच्या पथकाने अधिक तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. सदर प्रकरणात एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी शुभम गायकवाड यास 20 वर्ष सश्रम कारावास व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. संतोष दासरे यांनी काम पाहिले. सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, पैरवी अधिकारी वंजे यांनी मदत केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.