आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत 24 पोलिसांना पदोन्नती:कर्मचाऱ्यांना मिळाली गणेशोत्सवाची विशेष भेट, अधिक्षक कलासागर यांनी काढले आदेश

हिंगोली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हा पोलिस दलातील 24 पोलिस कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून या बाबतचे आदेश पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी सोमवारी ता. 5 सप्टेंबर रोजी रात्री उशीरा काढले आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाची भेटच असल्याचे मानले जात आहे.

हिंगोली जिल्हा पोलिस दलात सुमारे 870 पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबत मागील काही दिवसांपासून हालचाली सुरु होत्या. या संदर्भात पोलिस अधिक्षक कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांची बैठकही झाली होती.

या बैठकीत पदोन्नतीसाठी किती जागा रिक्त आहेत, संवर्गनिहाय किती कर्मचाऱ्यांना पदोन्नती देता येऊ शकते याची माहिती घेतली. त्यानंतर पदोन्नतीच्या हालचाली सुरु करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात पदोन्नती मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांमधून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, पोलिस अधिक्षक कलासागर यांनी सोमवारी (दि.5) रात्री उशीरा पदोन्नतीचे आदेश काढले आहेत. यामध्ये 11 पोलिस जमादारांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये जमादार राजेश ठोके, परसराम कुरुडे, वसंत हटकर, फिरोजपाशा, ज्ञानेश्‍वर कदम, नामदेव काळे, भालचंद्र मेथेकर, शशीकांत अंबेकर, शेषराव माघाडे, ज्ञानेश्‍वर पातळे, मनोहर शुक्ला, नंदकुमार मस्के यांचा समावेश आहे.

या शिवाय पोलिस नायक असलेल्या 13 जणांना जमादरपदावर पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये दिगंबर गिमेकर, गणपत मस्के, हनुमंत बेले, गणाजी पोटे, विलास वडकुते, अंकुश राठोड, संदीप टाक, संतोष नागरगोजे, किशन राखोंडे, शेख जावेद, इमरानोद्दीन सिद्दीकी, संतोष यादव, विक्रम कुंदनानी यांचा समावेश आहे. त्यांच्या पदोन्नतीबद्दल पोलिस दलातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...