आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:तांब्याची तार अन् ऑइलसह 26 लाखांचा ऐवज चोरीला, चौघे ताब्यात, हिंगोलीसह बुलडाण्यातील चोऱ्या उघडकीस

हिंगोली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील हात्ता नाईक शिवारात सौरऊर्जा प्रकल्पाची तांब्याची तार, ऑइल असा सुमारे २६ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला. मात्र, तांब्याची तार भंगारात मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी भंगार विक्रेत्यासह चौघांना ताब्यात घेतले.

हात्ता नाईक शिवारामध्ये ४८ एकर जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे. याठिकाणी असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील अडीच हजार लिटर ऑइल व दीड हजार किलो तांब्याची तार यासह इतर साहित्य असा २६ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, परभणीतील भंगार व्यापारी अजमत अली यांनी तांब्याची तार खरेदी केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून सर्जेराव भोसले, दीपक भोसले, अनुरथ हरगावकर व अजमत अली यांना ताब्यात घेतले. त्यांनी चोरीची कबुली दिली. ५ लाख ८० हजार रुपये जप्त केले आहेत. आरोपींनी हिंगोली जिल्ह्यात तीन, तर बुलडाणा जिल्ह्यातील एका चोरीची कबुली दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...