आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात 26,944 घरकुले मंजुरीच्या प्रतीक्षेत:प्रत्येक लाभार्थीला 5 ब्रास वाळू नसल्याचे कारण

मंगेश शेवाळकर | हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये १.०२ लाख म्हणजेच ४२.८५ टक्के घरकुले अद्यापही अपूर्ण आहेत. त्यामध्ये २६,९४४ घरकुले मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आता राज्याच्या ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला पत्र पाठवून १५ डिसेंबरपर्यंत घरकुलांना मंजुरी देण्यासाठी डेडलाइन दिली आहे. पुरेशी वाळू उपलब्ध नसल्याने घरकुल उभारणी रखडत असल्याचे म्हटले जात आहे. घरकुलासाठी लाभार्थींना १.२० लाख रुपयांचे अनुदान दिले जात असून स्वच्छ भारत मिशनअंतर्गत १२ हजार रुपये तर इतर पात्र लाभार्थींना हमी योजनेतून १८ हजार रुपये दिले जातात. मागील सहा वर्षांत मराठवाड्यात २.३८ लाख घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र त्यापैकी केवळ १.०९ लाख घरकुलांचे काम पूर्ण करता आले आहे. अद्यापही १.०२ लाख घरकुले अपूर्ण आहेत. प्रत्येक लाभार्थीला ५ ब्रास वाळू उपलब्ध होत नसल्याचे कारण सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...