आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटण्याच्या उसळ खाल्ल्यानंतर पोटदुखीचा त्रास सुरू:शालेय पोषण आहार खाल्ल्याने 30 विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास

हिंगोली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बुधवारी (५ जानेवारी) दुपारी विद्यार्थ्यांनी मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर पोटदुखीचा त्रास सुरू झाला. यात ३० विद्यार्थ्यांना उपचारासाठी तातडीने गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहे. उर्वरित विद्यार्थी शाळेच्या मैदानामध्ये बसवण्यात आले आहेत.

कडोळी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. या ठिकाणी २४० विद्यार्थी शिक्षण घेतात. नेहमीप्रमाणे गुरुवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शाळेत मध्यान्ह भोजनामध्ये वाटण्याच्या उसळ देण्यात आली. ती खाल्ल्यानंतर एका विद्यार्थिनीला उलटी अन् पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर शाळेतील सुमारे ३० विद्यार्थ्यांना पोटदुखी व मळमळ होण्याचा त्रास सुरु झाला. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर शाळा प्रशासनाने तातडीने गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली. त्यानंतर ३० जणांना उपचारासाठी गोरेगाव येथे हलवण्यात आले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पालकही शाळेत दाखल झाले.

बातम्या आणखी आहेत...