आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्फोटक पदार्थांचा बेकायदा साठा:हिंगोलीतून जिलेटीनच्या 321 कांड्या, 500 डिटोनेटर जप्त; शेतात एका बॉक्समध्ये ठेवले होते लपवून, एकाला अटक

प्रतिनिधी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज हिंगोलीत जिलेटीनच्या तब्बल 321 कांड्या आणि 500 डिटोनेटर सापडले आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील शिरला तांडा शिवारात हट्टा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एका आखाड्यावरुन सोमवारी सायंकाळी हे जिलेटिन व डिटोनेटर जप्त करण्यात आले आहेत. ​​​​​​

औंढा नागनाथ तालुक्यातील शिवारा मध्ये एका शेतात स्फोटक पदार्थ असल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, उपनिरीक्षक एस. एस. तावडे, जमादार भुजंग कोकरे, जीवन गवारी यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी एकनाथ राठोड यांच्या शिरला तांडा शिवारातील आखाड्यावर छापा टाकला. यावेळी आखाड्याची तपासणी केली असता एका कोपऱ्यामध्ये जिलेटिनच्या काड्याचा बॉक्स व डिटोनेटरचा बॉक्स लपवून ठेवल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी दोन्ही बॉक्स काढून पाहणी केली असता त्यामध्ये 321 जिलेटिनच्या कांड्या व 500 डिटोनेटर आढळून आले. पोलिसांनी दोन्ही बॉक्स जप्त करून एकनाथ राठोडयाच्या विरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

एवढी स्फोटके का आणली होती?
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अधिक चौकशी केली असता विहिरीच्या खोदकामासाठी जिलेटिनच्या कांड्या व डिटोनेटर आणण्यात आले होते. मात्र शिल्लक राहिलेल्या कांडया व डिटोनेटर योग्य पद्धतीने हाताळणी करून त्याचा साठा करणे आवश्यक होते. मात्र शिल्लक राहिलेल्या कांड्या शेतातील आखाड्यावर निष्काळजीपणाने ठेवण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. या प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...