आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षांचा वाढदिवस:‘हॅपी बर्थडे टू यू’च्या सुरात 9018  वृक्षांचा तिसरा वाढदिवस साजरा

हिंगोली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीईओंची उपस्थिती हिंगोलीतील दाटेगावात कार्यक्रमाचे आयाेजन

मुलांचा किलबिलाट, ठिकठिकाणी झाडांना रंगीबेरंगी फुगे बांधलेले, घरासमोर आकर्षक रांगोळ्या, सर्वत्र उत्साहाचे वातावरण अन् रात्री सात वाजता “हॅपी बर्थडे टू यू’ अशा सुरात अन् टाळ्यांच्या गजरात ९०१८ वृक्षांचा तिसरा वाढदिवस साजरा झाला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय दैने यांचीही उपस्थिती होती.हिंगोली तालुक्यातील दाटेगाव हे सुमारे १,५०० लोकसंख्या व २५८ घरांचे गाव. या गावात ग्रामसेवक उत्तम आडे यांनी सर्व गावकऱ्यांना एकत्रित करून गावात नागरी सुविधांसोबतच नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी गावकऱ्यांची बैठक घेऊन त्यांना वृक्ष लागवड, स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्यानुसार गावात मोकळ्या जागेवर वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे दरवर्षी २० जानेवारी रोजी या झाडांचा वाढदिवसदेखील साजरा केला जातो.

बातम्या आणखी आहेत...