आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल जीवन मिशन:6 महिन्यांत 4 % उद्दिष्टपूर्ती, दीड वर्षात 7,427 याेजना पूर्ण करण्याचे आव्हान

मंगेश शेवाळकर | हिंगोली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात जल जीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या ७,७२८ पाणी योजनांपैकी २,४४६ पाणी योजनांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी केली जाणार आहे. या संदर्भातील स्पष्ट सूचना पाणीपुरवठा विभागाला देण्यात आल्या आहेत. दरम्यान, ६ महिन्यांत केवळ ३०१ कामे म्हणजे ४ टक्केच काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ७,४२७ कामे मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करायची आहेत.

मराठवाड्यात जल जीवन मिशनअंतर्गत टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने जल जीवन मिशनअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. यासाठी संस्थांची निवड करून त्यांच्या माध्यमातून गाव पातळीवर सर्वेक्षण करून गावाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार गावात पाणीस्रोताचे ठिकाण, जलकुंभाची उभारणी, जलवाहिन्या टाकणे तसेच पुढील तीस वर्षांपर्यंत पाणीपुरवठ्याचा आराखड्यात समावेश आहे.

दरम्यान, मराठवाड्यात ७७२८ नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २१४५ योजनेची कामे प्रगतिपथावर असून ३०१ नळ पाणी योजनांची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये योजना पूर्ण होईपर्यंत तीन टप्प्यांमध्ये तपासणीचे काम केले जाणार आहे. या तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटींची माहिती तातडीने ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिली जाणार असून या त्रुटींची पूर्तता केल्यानंतरच पुढील कामे केली जातील.

यासंदर्भात राज्याच्या पाणी व स्वच्छता मिशन कार्यालयाने सर्व ग्रामीण पाणीपुरवठा विभागांना पत्र पाठवून त्यांच्याकडे तपासणी योग्य असलेल्या योजनांची माहिती सादर केली आहे. या तपासणीचे काम तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे आता पुढील काळात योजनांच्या तपासणीचे काम हाती घेतले जाणार आहे.

मार्च २०२४ पर्यंत गावागावात पाणी पाेहाेचणार कसे हा प्रश्न कायम टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेड करणार तपासणी शासनाने राज्याच्या विविध भागांत तपासणीच्या कामासाठी संस्थांची निवड केली आहे. यामध्ये मराठवाड्यासाठी टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेड या कंपनीची निवड केली आहे. या कंपनीमार्फत कामांची तपासणी करून कामातील त्रुटींची माहिती दिली जाणार आहे.

राज्यात ३ संस्थांकडे तपासणीचे काम राज्यात ३७,१६६ पाणी योजनांना मंजुरी मिळाली. त्यापैकी १२,३७७ योजना प्रगतीपथावर आहेत. २१९६ योजना पूर्ण झाल्या. १४,५७३ योजना तपासणी केवळ तीन संस्थांद्वारे करण्यात येणार आहे.

मराठवाड्यातील नळ योजनांची स्थिती जिल्हा याेजना प्रगतिपथावर याेजना पूर्ण तपासणी औरंगाबाद १२८५ ३१८ ४२ ३६० जालना ७३९ १६७ १८ १८५ बीड १३१५ ३५१ ०० ३५१ परभणी ७७४ १३० ०५ १३५ हिंगोली ६०७ १९५ ०१ १९६ लातूर ९४२ ३५२ ६५ ४१७ नांंदेड १३०७ ३७८ ६४ ४४२ उस्मानाबाद ७५९ २५४ १०६ ३६०

बातम्या आणखी आहेत...