आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षणार्थी गुरुजी घामाघूम:ऑनलाइन प्रशिक्षण घेणाऱ्या 4 हजार शिक्षकांना पासवर्डच मिळाला नाही, संगणक वारंवार विस्कळीत

हिंगोली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यासाठी नोंदणी केलेल्या तब्बल ४ हजार शिक्षकांना पासवर्डच मिळाला नाही, तर दुसरीकडे संगणक प्रणाली वारंवार विस्कळीत होत असल्याने प्रशिक्षणार्थी गुरुजी घामाघूम होऊ लागले आहेत.

राज्यामध्ये वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांचे या वर्षी ऑनलाइन प्रशिक्षण घेतले जात आहे. त्यासाठी शिक्षकांचे ई-मेल आयडी मागवण्यात आले. त्यानुसार राज्यातील सुमारे ९४ हजार पात्र शिक्षकांनी राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेकडे ई-मेल आयडी पाठवले होते. त्यानुसार परिषदेने या सर्व शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षणासाठी पासवर्डदेखील पाठवले. विशेष म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा शैक्षणिक व संशोधन परिषदेचे कार्यालय असताना शासनाने खासगी संस्थेला प्रशिक्षण देण्याचे कंत्राट दिले आहे. १ जूनपासून या शिक्षकांचे २१ दिवसांचे प्रशिक्षण सुरू झाले. मात्र प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी खासगी कंपनीकडून तांत्रिक बिघाडामुळे प्रशिक्षण देण्यास उशीर झाला. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा संगणक प्रणालीमध्ये दोष निर्माण होऊ लागले. त्यामुळे प्रशिक्षणार्थी शिक्षक चांगलेच घामाघूम होऊ लागले आहेत. दरम्यान, राज्यातील ४ हजार शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षणाला लॉगिन करण्यासाठी पासवर्ड मिळाला नाही. त्यामुळे राज्यातील या गुरुजींमध्येही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता शाळा सुरू होणार असल्यामुळे ऑनलाइन प्रशिक्षण घ्यावे कसे, असा प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहिला आहे.

विभागाची माहिती; दीड हजार शिक्षकांना दिले पासवर्ड
यासंदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेकडे दूरध्वनीवरून संपर्क साधला असता राज्यात ९४ हजार शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू असून चार हजार शिक्षकांनी माहिती भरताना ई-मेल आयडी चुकीचा दिल्यामुळे त्यांना पासवर्ड मिळाला नाही. आतापर्यंत दीड हजार शिक्षकांची माहिती भरून त्यांना पासवर्ड देण्यात आले असून उर्वरित शिक्षकांना तातडीने पासवर्ड देण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...