आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात नुकसान:हिंगोली जिल्ह्यात सुधारित पैसेवारी 48.29 पैसे

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यात सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील एकत्रित पैसेवारी ४८.२९ पैसे असल्याचे स्पष्ट झाले. सर्वात कमी ४५ पैसेवारी वसमत तालुक्याची आहे. यावरूनच अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात नुकसान झाल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३.९८ लाख हेक्टर आहे. मात्र प्रत्यक्षात ३.७६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. यामध्ये सर्वात जास्त २.५० लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्या पाठोपाठ ३० हजार हेक्टरवर तुरीची पेरणी तर ४० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. दरम्यान, प्रशासनाने ता. ३० सप्टेंबर रोजी हंगामी पैसेवारी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील एकत्रित पैसेवारी ५४.५२ पैसे आली होती, असे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...