आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामांवर प्रश्नचिन्ह:अभियंत्यांची 50 टक्के पदे रिक्त; पाणी योजनेची कामे संथगतीने

हिंगोली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्यात जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामांची गती लक्षात घेता ही कामे मुदतीत पूर्ण होणे कठीण असल्याचे दिसते. त्यामुळे योजनेचे पाणी पुढील वर्षी मिळण्याची शक्यताही कमीच आहे. तर दुसरीकडे कार्यालयात अभियंत्यांची ५० टक्के पदे रिक्त असल्यावर कामे वेळेत पूर्ण करण्यात अडचणी येणार असल्याचे कार्यकारी अभियंत्यांचे म्हणणे आहे.

हिंगोली जिल्ह्यात ५६३ ग्रामपंचायती असून ७०७ गावे आहेत. दरम्यान, जल जीवन मिशनअंतर्गत मागील वर्षात हिंगोली जिल्ह्यासाठी ६३० नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. या योजनांचा आराखडा तयार करून कामाला तांत्रिक मान्यता देण्याचे आदेश दिले. मात्र केवळ ५०० योजनांचाच आराखडा तयार झाला असून केवळ २३५ कामांना मान्यता देऊन १५० कामांच्या निविदा लावण्यात आल्या आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये अभियंत्यांची २२ पदे असून त्यापैकी १० पदे रिक्त आहेत. तसेच उपअभियंत्यांची ५ पदे मंजूर असून चार पदे रिक्त आहेत. दरम्यान, ग्रामीण पाणीपुरवठा विभागात पन्नास टक्के पदे रिक्त असल्याचे हिंगोली पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्के यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...