आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • 5.5 Lakh Families In Marathwada Dry Throat, Only 1 Lakh 70 Thousand Families Get Plumbing Under Jaljivan Mission| Marathi News

दिव्य मराठी विशेष:मराठवाड्यात 5.5 लाख कुटुंबांचा घसा कोरडा, जलजीवन मिशनअंतर्गत 1 लाख 70 हजार कुटुंबांनाच मिळाली नळजोडणी

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाड्यात जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट असून सरत्या आर्थिक वर्षात ७ लाख २४ हजारपैकी केवळ १ लाख ७० हजार कुटुंबांनाच नळजोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे अद्यापही साडेपाच लाख कुटुंबांचा घसा कोरडाच आहे.

जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळजोडणी देण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक कुटुंबाला प्रतिमाणशी ५५ लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीमार्फतची कामे हाती घेण्यात आली होती. मात्र नळजोडण्यांचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. मराठवाड्यामध्ये सन २०२१- २२ या आर्थिक वर्षात ७ लाख २४ हजार कुटुंबाला नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयाने वेळोवेळी बैठका घेऊन नळजोडण्यांचा आढावा घेतला आहे. तसेच नळजोडणीचे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

मात्र मराठवाड्यात केवळ १ लाख ७० हजार कुटुंबांनाच नळजोडणी देण्यात आली आहे. मराठवाड्यात दिलेला उद्दिष्टापैकी केवळ २३ टक्केच उद्दिष्ट पूर्ण करता आले आहे. नळजोडणी नसल्यामुळे गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू असून गावकऱ्यांना खासगी नळ योजना किंवा टँकरचा सहारा घ्यावा लागत आहे. सध्या तरी मराठवाड्यात साडेपाच लाख कुटुंबांचा घसा कोरडाच असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे जालना जिल्ह्यात मागील एक वर्षात एकही नळ जोडणी झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता नळजोडणी कधी होणार याकडे साडेपाच लाख कुटुंबांचे लक्ष लागले आहे.

मराठवाड्यातील नळजोडण्यांची स्थिती अशी
जिल्हा उद्दिष्ट नळजोडणी मिळालेली कुटुंबे
औरंगाबाद ९७ हजार २० हजार ४६४
जालना १,४७३ ०००
परभणी १ लाख ४ हजार ७ हजार ४२७
हिंगोली ७९ हजार ४५६ १० हजार २९९
नांदेड १ लाख ३६ हजार ४२ हजार ६०७
उस्मानाबाद ९० हजार १७ हजार ३९५
बीड ९५ हजार ३२ हजार ९००
लातूर १ लाख २० हजार ३९ हजार ३६८

बातम्या आणखी आहेत...