आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 कोटींचा घोटाळा;:तत्कालीन अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नर्सी नामदेव येथे संस्थानच्या अध्यक्षपदाचा कारभार असताना सुमारे ६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून संस्थानचा तत्कालीन अध्यक्ष सतीश विडोळकर याच्यावर नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुरुवारी (६ एप्रिल) रात्री उशिरा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्सी नामदेव येथे संत नामदेव संस्थान आहे. या संस्थानचे तात्पुरते विश्वस्त असतानाही सतीश विडोळकर याने १६ ऑगस्ट २००८ ते २९ जुलै २०१७ या कालावधीत महाराष्ट्र व पंजाब राज्यातून आलेल्या देणगीचे पैसे, दानपेटीचे पैसे, इतर देणगीचे पैसे, संस्थानची जागा व पावत्यांचे खोटे हिशेब दाखवून पैशाची अफरातफर करून सुमारे ६ कोटींचा गैरव्यवहार केला. यात सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालय, हिंगोली यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून संस्थानचे व्यवस्थापन विश्वस्त अंबादास गाडे यांनी गुरुवारी रात्री उशिरा नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी सतीश विडोळकर याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.