आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना:8.53 लाख शेतकऱ्यांचा डाटा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, केंद्र शासनाची नाराजी

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनेमध्ये ८.५३ लाख शेतकऱ्यांचा डाटा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून यामुळे शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. या प्रकारामुळे केंद्र शासनाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2019 पासून राबविण्यात येणाऱ्या या योजनेमध्ये राज्यात 1 कोटी 14 लाख 93 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, त्यापैकी 1 कोटी 9 लाख 33 हजार पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना 18120 कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे.

दरम्यान राज्यांमध्ये अद्यापही 8 लाख 53 हजार शेतकरी डाटा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभ मिळालाच नाही. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांची डाटा दुरुस्ती करून घेण्याबाबत केंद्र शासनाकडून वारंवार सूचना देण्यात आल्यानंतर ही सदरील काम रखडली आहेत.

त्यानंतर राज्य शासनाने तसेच राज्याच्या कृषी आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र पाठवले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या डाटा दुरूस्तीसाठी गाव पातळीवर विशेष शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना या पत्राद्वारे दिल्या आहे.

आयुक्त कार्यालयाच्या या पत्रानुसार राज्यात मार्च महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी म्हणजेच २५ मार्च रोजी गाव पातळीवर डाटा दुरुस्तीचे काम करण्यासाठी शिबिर आयोजित केले जाणार आहे. सदरील काम संपूर्ण शेतकऱ्यांचा डाटा दुरुस्ती होईपर्यंत सुरू ठेवावे, असेही या पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांच्या डाटा दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना तातडीने या योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...