आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:शेतामध्ये अर्धा किलो सोने असल्याची थाप मारत पितळी शिक्के देत फसवले, 8 जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेनगाव तालुक्यात १ लाखाचा गंडा, ८ जणांवर गुन्हा दाखल

सेनगाव तालुक्यात सवना शिवारात शेतात अर्धा किलो सोने असल्याचे सांगून एक लाख रुपये घेऊन शेतातील खड्ड्यातून पितळी शिक्के काढून दिल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी गोरेगाव ठाण्यात शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दोघांना अटक केली.

सवना येथील अमोल कैलास साळवे यांचे सवना शिवारात शेत आहे. त्यांच्या शेताच्या बाजूलाच टनका (जि. वाशिम) येथील संतोष उद्धव गवळीचे शेत आहे. काही दिवसांपूर्वी संतोषने अमोल यांना तुमच्या शेतात पितळी तांब्यात सोने असल्याचे सांगितले. सोने काढून देण्यासाठी १ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. अमोल साळवे यांनी संतोष व त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींना १ लाख रुपये दिले. ठरल्याप्रमाणे संतोष गवळी याच्यासह रफिक पठाण, माधव कांबळे (रा. तोंडगाव, जि. वाशिम) व अन्य चार ते पाच जण १ फेब्रुवारीला रात्री सात वाजेच्या सुमारास शेतात आले. माधवन सोने दिसले असून खड्डा खोदण्यास सांगितले. खोदकामानंतर एका पितळी तांब्यातून काही शिक्के काढून देत १ लाख रुपये घेऊन काढता पाय घेतला. अमोल यांनी शिक्क्यांची पाहणी केली असता ते पितळेचे निघाले. त्यामुळे त्यांनी टनका येथे संतोषला शोधले. पण तो सापडला नाही. याबाबत शुक्रवारी गोरेगाव ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संतोष गवळी, रफिक पठाण, माधव कांबळे व इतर पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पीएसआय बाबूराव जाधव, जमादार कुंदर्गे, अनिल भारती यांच्या पथकाने तातडीने दोन जणांना अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...