आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल:हिंगोली जिल्ह्यात 91 हजार शेतकऱ्यांचे नुकसान

हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात जुलैत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल तयार केला आहे. यात तब्बल ९१ हजार शेतकऱ्यांच्या शेतातील ८० हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा प्रशासनाने अंतिम अहवाल शासनाकडे सादर केला.

जिल्ह्यात जूनअखेरीस झालेल्या पेरणीनंतर सततच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. विशेषतः वसमत तालुक्यात जास्त फटका बसला. काही ठिकाणी जमीन खरडून गेली. दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांच्या पथकाने गावांमध्ये भेटी देऊन पाहणी केली. महसूल, पंचायत व कृषी विभागाच्या पथकाने अतिवृष्टी झालेल्या भागात पिकांची शेतात जाऊन पाहणी केली आहे. त्यानुसार पंचनामे करून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.

जिल्ह्यातील स्थिती अशी : जिल्ह्यात ९१,९९४ शेतकऱ्यांचे ८०,०३७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. जिरायती पिकांत ८३,८८९ शेतकऱ्यांचे ७५,२९४ हेक्टरचे नुकसान झाले. यात सर्वात जास्त सोयाबीन ७३,८४९, कापूस ८१३, ज्वारी ३२६, तूर २१८, तर मुगाचे ८८ हेक्टरचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार भरपाईसाठी ५१.१९ कोटींची आवश्यकता आहे.

बातम्या आणखी आहेत...