आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच घेणारा मुख्याधिकारी निलंबित:कळमनुरीत देयकासाठी घेतली 40 हजारांची लाच

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी येथे सिमेंट रस्त्याच्या कामाचे देयक काढण्यासाठी ४० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्या निलंबनाचे आदेश नगरविकास विभागाने काढले असून ते आदेश शुक्रवारी (२ डिसेंबर) पालिकेला प्राप्त झाले. कळमनुरी येथे पालिकेच्या वतीने एका कंत्राटदारामार्फत रस्त्याचे बांधकाम केले होते. या कामाचे आठ लाख रुपयांचे देयक अदा करणे बाकी होते. त्यामुळे कंत्राटदाराने पालिका मुख्याधिकारी उमेश कोठीकर यांच्याकडे वारंवार देयकाची मागणी केली. मात्र कोठीकर याने त्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली होती. त्यावरून लाचलुचपतचे उपाधिक्षक नीलेश सुरडकर, पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर, विजय पवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक शेख युनूस, जमादार विजय उपरे, तानाजी मुंडे, राजाराम फुफाटे, ज्ञानेश्‍वर पंचलिंगे यांच्या पथकाने १५ जुलै रोजी सापळा रचून कोठीकर यास चाळीस हजारांची लाच घेताना पकडले होते. याप्रकरणी कळमनुरी ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. लाचलुचपत विभागाने या प्रकाराची सविस्तर माहिती पालिका प्रशासन व शासनाकडे सादर केली. त्यावरून राज्याच्या नगरविकास विभागाने तत्कालीन मुख्याधिकारी उमेश कोठीकर यास निलंबित केले.

बातम्या आणखी आहेत...