आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिथावणीखोर वक्तव्य भोवले:शिवसेना हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या विरुध्द गुन्हा दाखल

हिंगोली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निष्ठा मेळाव्यात चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी शिवसेना हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या विरुध्द हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 2 गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली येथे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत सोमवारी ता.1 दुपारी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा निष्ठा मेळावा घेण्यात आला. यामेळाव्यात थोरात यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख होण्यासाठी इच्छूक असलेल्यांना आवाहन करीत गद्दारांची वाहने त्यांच्या गावात आल्यानंतर वाहने फोडण्याचे आवाहन केले. गद्दारांची वाहने फोडणाऱ्यांचा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाईल असेही यावेळी सांगितले.

या प्रकरणात हिंगोलीतील सचिन प्रकाश पवार यांनी आज दुपारी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थारोत यांनी शांतता भंग व्हावा असे वक्तव्य केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. यावरून पोलिसांनी बबनराव थोरात यांच्या शांतता भंग केल्या प्रकरणी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जिव्हारे पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...