आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत दगडफेक प्रकरण:20 जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल, 6 महिलांचा समावेश

प्रतिनिधी | हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेची पथके

हिंगोली येथील जलेश्‍वर तलावाच्या परिसरात पोलिस व पालिका कर्मचाऱ्यांवर दगडफेक करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी २० जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १७) रात्री गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सहा महिलांचाही समावेश आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

अतिक्रमणाला विरोध

हिंगोली शहरातील जलेश्‍वर तलावाच्या परिसरात असलेली उर्वरीत अतिक्रमणे काढण्याबाबत सुचना देण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचारी व पोलिसांवर जमावाने शनिवारी दुपारी दगडफेक केली होती. त्यानंतर जमावाने शहरातील अंबिका टॉकीज परिसरात रास्तारोको सुरु केला होता. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपाधिक्षक विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

याप्रकरणात पालिकेचे कर्मचारी पंडीत मस्के यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात निरंजन सातपुते, सागर रणवीर, शिवम काळे, मुकेश काळे, आनंद धवसे, शंकर गाधी, अक्षय वाघमारे, अनिल निळकंठे, नितीन पवार, हेमंत शेळके, अक्षय मांडगे, किशोर खिल्लारे यांच्यासह अन्य आठ जणांवर शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, या प्रकरणात आरोपींचा शोध घेण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेवर सोपविण्यात आली असून गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, शिवसांब घेवारे, जमादार संभाजी लकुळे, सुनील अंभोरे, शेख शकील, गजानन पोकळे, भगवान आडे, किशोर सावंत यांचे पथक स्थापन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...