आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षुल्लक कारणावरून खून; दोन जणांना अटक:औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील येळी शिवारात एका तरुणाचा क्षुल्लक कारणावरून खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांवर बुधवारी (१८ जानेवारी) पहाटे खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. औंढा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

येळी येथील गजानन अंकुश नागरे (३५) हा १५ जानेवारीला रात्री मित्रासोबत येळी शिवारातील आखाड्यावर गेला होता. त्या ठिकाणी त्याचा गोपीचंद मारुती आव्हाड याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद तेथे असलेल्या दामोदर भागोजी नागरे याने सोडवला. मात्र काही वेळातच पुन्हा वाद सुरू होऊन गोपीचंदने गजाननला मारहाण केली. यामुळे गजानन जागीच कोसळला. या प्रकारानंतर सोमवारी (१६ जानेवारी) सकाळी गोपीचंद व दामोदर गावात निघून आले. दुपारच्या वेळी दामोदर याने आखाड्यावर जाऊन पाहिले असता गजानन हालचाल करीत नसल्याचे दिसून आले. यामुळे घाबरलेल्या दामोदरने गोपीचंदला माहिती दिली. दोघेही पुन्हा आखाड्यावर आले अन् त्यांनी गजानन याचा मृतदेह ओढत नेऊन इतर ठिकाणी असलेल्या शेतातील हळदीच्या पिकात फेकून दिला.

बातम्या आणखी आहेत...