आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औंढ्यात भाजप नगरसेविकेला ठार मारण्याची धमकी:मटण दुकान, पोल्ट्री फॉर्म बंद करण्याबाबत केली होती तक्रार; 10 जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हयातील औंढा नागनाथ येथे मटन दुकान व पोल्ट्री फॉर्म बद्दल शासनाकडे तक्रार का केली या कारणावरून भाजपा नगरसेविकेला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी दहा जणांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 5 रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

काय आहे प्रकरण?

देशातील आठवे ज्योतिर्लिंग म्हणून औंढा नागनाथची ओळख आहे. या ठिकाणी देशभरातून भाविक नागनाथाच्या दर्शनासाठी येतात. मात्र काही ठिकाणी मटन विक्रीच्या दुकानांमुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या शिवाय परिसरात काही भागात पोल्ट्री फॉर्म देखील सुरू करण्यात आला आहे. भाविकांना होणारा त्रास लक्षात घेता भाजपाच्या नगरसेविका दीपाली शरद पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. यामध्ये मटन विक्रीची दूकाने बंद करावी अशी मागणी केली. तसेच पोल्ट्री फॉर्म बद्दलही तक्रारीत नमुद केले होते.

भाजप नगरसेविकेला धमकी

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर औढा येथील अन्नू कुरेशी, अक्तर कुरेशी, शेपी कुरेशी, मेहराज कुरेशी, सोहेल कुरेशी, जावेद कुरेशी, अफरोज कुरेशी, फेरोज कुरेशी, अहेमद कुरेशी, मुक्तार कुरेशी यांनी शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता नगरसेविका पाटील यांच्या घरासमोर येऊन त्यांना तु अवैध पोल्ट्री फॉर्म व मटन विक्रीच्या दुकानाबाबत तक्रार का केली असे म्हणत अश्‍लिल भाषेत शिवीगाळ केली. तसेच त्यांना व त्यांच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात नगरसेविका पाटील यांनी रात्री उशीरा औढा नागनाथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विश्‍वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा वाळके पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...